Shree Yantra

Tradition - 2021-12-22 12:06:05

Bimb India

आदिशंकराचार्य व पुष्पदन्त [३]यांनी रचलेल्या “सौदर्यं लहरी” नावाचा या संस्कृत भाषेतील ग्रंथात “श्री यंत्र” उपासनेविषयी सांगितले आहे . हिंदू व्रतवैकल्यांमध्ये श्रीलक्ष्मी पूजनातील एक आकृती आहे. हा एक तांत्रिक पूजेचा किंवा कर्मकांडाचा भाग आहे. हे यंत्र कागदावर द्विमितीय आकृती स्वरूपात किंवा सोने किंवा पंचधातू यांपासून त्रिमितीय स्वरूपात तयार केले जाते. याचे विशिष्ट प्रकारचे निश्चित असे मोजमाप असते. भारतातील अनेक मंदिरांत प्राचीन काळापासून श्रीयंत्र स्थापित केलेले दिसून येते. श्री यंत्राच्या मध्यभागी एक बिंदु असून त्याच्याभोवती चारही बाजूंनी एकातएक गुंतलेले नऊ त्रिकोण असतात. हे नऊ त्रिकोण नऊ शक्तीचे प्रतीक असल्याचे सांगितले जाते. या नऊ त्रिकोणांच्या अंतरभाजनाने एकूण त्रेचाळीस त्रिकोण तयार होतात. या आकृतीभोवती आठ कमळांच्या दलांचे एक वलय असते. त्याभोवती दुसरे सोळा कमळाच्या पाकळ्यांचे अजून एक वलय असते. यांच्या चारी बाजूंभोवती प्रत्येकी तीन वर्तुळाकार पायर्‍या असतात. आणि त्यांच्याही खाली विशिष्ट आकारमानाच्या तीन चौकोनी पायर्‍या असतात. असे मानले जाते की या सर्व विविध ठिकाणी देवीची एकूण साठ रूपे विराजमान आहेत.